पुणे(Pune); पिंपरी(Pimpri) अनलॉक(Unlock) कऱण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला....पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील(Pimpri Chinchwad) निर्बंधांमध्ये राज्य सरकारने मोठी शिथिलता दिलीय...आता पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार असून पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मॉल्स रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र दोन्ही लशी घेणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान सात टक्केच्या पुढे पॉझिटिव्ह दर गेला तर दिलेली मुभा मागे घेतली जाईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी दिलाय....पुणे ग्रामीणमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं
#puneunlock #punecityunlock #punecity #unlockbegins #punelivenews #puneliveupdate